Pune Visarjan 2023 : पुण्यात नो कोयता, फक्त हवी शांतता; देखाव्यातून जनजागृती करत पोलिसांना सलाम

एमपीसी न्यूज : पुण्यात वाढत्या गुन्हेगारी विरोधात जनजागृती (Pune Visarjan 2023) करण्यासाठी कोयता गँग विरोधात भव्य देखावा साकारण्यात आला असून कोयता गँगच्या मुसक्या आवळण्याऱ्या पुणे पोलिसांना गणेश मंडळाकडून सलाम देखील करण्यात आले आहे. हा भव्य देखावा वैभव मित्र मंडळाने साकारला आहे. 

विसर्जन मिरवणुकीत बसवला चक्क पोलीस उपायुक्तांच्या फ्लेक्स –

विशेष म्हणजे या देखाव्यात कोयता गॅंगला आव्हान देणाऱ्या पोलीस उपयुक्त संदीप सिंह गिल यांच फ्लेक्स देखील लावण्यात आला आहे. तसेच त्यावर त्यांचा डायलॉगही लिहिण्यात आला आहे.

”आता तुम्ही कोयता घेऊनच दाखवा मग दाखवतो तुम्हाला बल्ले बल्ले”

Photo Feature : लालबहादूर शास्त्री मित्र मंडळाच्या पारंपरिक ढोल ताशा वादनाने परिसर दुमदुमला

पोलिसांचे कौतुक – Pune Visarjan 2023

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ कसा?अशी मंडळाकडून विसर्जनात बॅनरबाजी करण्यात आली होती. तर काही दिवसांपूर्वी पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या कोयता गॅंग विरोधात लढणाऱ्या पोलिसांचे देखील कौतुक करण्यात आले होते.

Photo Feature : पारंपारिक वादनात उद्योगनगरी दंग; तर सुरक्षेसाठी विनयकुमार चौबे यांची पाहणी

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.