Pune : आमदार विश्वजीत कदम कार अपघातातून थोडक्यात बचावले !

एमपीसी न्यूज- काँग्रेसचे कार्याध्यक्ष आणि सांगलीतील आमदार विश्वजीत कदम हे कार अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. मुंबईहून पुण्याला येत असताना पुण्यामध्ये झाडाला त्यांची कार धडकून हा अपघात झाला.

या अपघातात कारचालक आणि आमदार विश्वजीत कदम सुखरूप असून त्यांच्या खांद्याला किरकोळ दुखापत झाली आहे. सर्व वैद्यकीय चाचण्या करून घेतल्यानंतर ते कराडच्या दिशेने रवाना झाले. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले. विश्वजीत कदम हे काँग्रेसचे दिवंगत नेते पंतगराव कदम यांचे पुत्र आहेत.

दरम्यान, साहेबांचे आशीर्वाद आणि आपल्या सर्वांच्या सदिच्छा पाठीशी आहेतच. मी सुखरूप आहे काळजी नसावी ! असे विश्वजित कदम यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.