Pune : घरफोड्या करुन धुमाकूळ घालणारी टोळी वानवडी पोलिसांकडून जेरबंद

वानवडी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी

एमपीसी न्यूज- पुणे शहरासह आणि संपूर्ण महाराष्ट्रात गंभीर स्वरूपाच्या घरफोडी व जबरी चोरी करून धुमाकूळ घालणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी गजाआड केले आहे. 

उजालासिंग प्रभुसिंग टाक (वय-27), गोरखसिंग गागासिंग टाक (वय-29), बल्लूसिंग प्रभुसिंग टाक (वय- 30), जलसिंग रजपुतसिंग दुधानी (वय- 26, सर्व रा. रामटेकडी हडपसर पुणे), सत्यनारायण देवीलाल वर्मा (वय-43 वर्षे रा. लोणिकाळभोर पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

वरील आरोपींकडे कसून चौकशी केली असता त्यांनी पुणे शहर, पुणे ग्रामीण व पिंपरी-चिंचवड परिसरात वेळोवेळी गंभीर स्वरूपाच्या घरफोडी व जबरी चोऱ्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून सुमारे 1 किलो सोन्याचे दागिने, 10 किलो चांदीचे दागिने व वस्तु, एक परदेशी बनावटीचे पिस्तूल, 6 जिवंत काडतुसे, 6 चारचाकी गाड्या, 1 मोटरसायकल, घरफोडीचे साहित्य, बनावट नंबर प्लेट असा एकुण 81 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

वानवडी पोलिसांनी याबाबतची माहिती दिली. पोलीस शिपाई नासिर देशमुख, सुधीर सोनवणे, नवनाथ खताळ, महेश कांबळे हे कर्मचारी 10 ते 15 दिवसांपूर्वी घरफोडी चोरी करणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी वानवडी परिसरात पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी नासिर देशमुख व सुधीर सोनवणे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे घरफोडी करणाऱ्या शिकलकरी आरोपीना तपास पथकाच्या मदतीने सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी कामगिरी केली आहे.

तपासादरम्यान, वानवडी, कोथरूड, दत्तवाडी, कोरेगावपार्क, भारती विद्यापीठ, हडपसर, कोंढवा, मार्केटयार्ड, खडकी, वाकड,निगडी, भोसरी, विश्रांतवाडी, डेक्कन, लोणीकाळभोर, यवत, शिक्रापूर या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत केलेले 50 गुन्हे उघडकीस आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.