BNR-HDR-TOP-Mobile

Pune : देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर पडायचे असल्यास सांगा ; पोलिसांचे देहविक्री करणाऱ्या महिलांना आवाहन

1,107
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज- ज्या महिलांना देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर पडायचे आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांची नक्की मदत करण्यात येईल. असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील रेडलाइट एरियामध्ये पुणे पोलिसांनी काल, बुधवारी कोंबिंग ऑपरेशन राबवले. यावेळी पोलिसांनी कुंटणखाना मालकीण आणि देहविक्रय करणाऱ्या महिलांना एकत्र करून त्यांच्याशी संवाद साधला.

‘या रेडलाईट एरियात होणारी कुठलीही चुकीची गोष्ट पोलीस खपवून घेणार नाहीत. त्यामुळे तुम्ही कुठलंही चुकीचं काम करू नका. वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचा वापर करू नका. तसेच या ठिकाणी देहविक्री करण्यासाठी बांग्लादेशी तरुणी असतील तर आम्हाला सांगा. कारण बांगलादेशी मुली याठिकाणी आलेल्या चालणार नाहीत. ज्या कुंटणखाना मालकिणीकडे बांग्लादेशी तरुणी सापडतील त्यांचं काही खरं नाही. आणि सर्वात महत्त्वाचे ज्या महिलांना देहविक्रीच्या दलदलीतून बाहेर पडायचे आहे त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांची नक्की मदत करण्यात येईल’ अस आवाहन पोलिसांनी केले आहे. यावेळी पोलिसांनी या महिलांना कुठल्या अडचणी आहेत का? कुणी त्रास देतंय का? हे देखील जाणून घेतले.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.