Pune : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नायडू रुग्णालयात वॉर बॉट रोबोट दाखल

War bot robot admitted to Naidu Hospital in the background of Corona

नववीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने तयार केला रोबोट

एमपीसी न्यूज – पुणेकर नेहमीच आपल्या हटक्या स्टाईलने ओळखले जातात. सध्या कोरोनाच्या संकट काळात नववीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाने रोबोट तयार केला आहे. डॉ. नायडू रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी हा वॉर बॉट रोबोट सोमवारपासून दाखल झाला आहे. सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे यांच्याकडे रोबोटिक ट्रॉली विराज राहुल शहा याने मोफत प्रदान केली. यावेळी डॉ. सुधीर पोटसुते, संदीप शहा, राहुल शहा, करण शहा, दीप विवेक सेठ उपस्थित होते.

रोबोट निर्माता विराज शहा सध्या पुणे लष्कर परिसरातील दस्तुर शाळेत इयत्ता 9 वीत शिक्षण घेत आहे. त्याला रोबोट तयार करणे, कोडिंग आणि स्पेस या क्षेत्रात आवड आहे. या क्षेत्रात काहीतरी नावीन्य करण्याकरिता त्याची सतत धडपड चालू असते.

पुणे ते पालिताना गुजरात हे 900 किलोमीटर अंतर सायकलवरून त्याने 8 दिवसांत पूर्ण केल्याबद्दल त्याला पुणे महापालिकेतर्फे ‘प्राईड ऑफ पुणे’ गौरव पदकाने सन्मानित करण्यात आलेले आहे.

कोरोनाच्या संकट काळात आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना काहीतरी केले पाहिजे, या विचाराने विराजने कोरोना बाधित रुग्णांना द्यावयाची औषधे, गोळ्या, चहा, नाश्ता, जेवण देण्यासाठी येथील डॉकटर्स, नर्सेस, कर्मचाऱ्यांना सतत पर्सनल प्रोटेक्शन किट घालून सेवा द्यावी लागते.

हा त्रास कमी करण्यासाठी रोबोटची प्रतिकृती निर्मिती केली. त्याला अभियांत्रिकी क्षेत्राचे ज्ञान नसूनही धडपड वृत्तीने त्याने हा रोबोट विकसित केला. यासाठी त्याला त्याचे मित्र कारण शहा, दीप विवेक सेठ यांची मदत झाली.

गेली 40 दिवस सातत्याने काम केले. लॉकडाऊन काळात रोबोट तयार करण्यासाठी हवे तसे साहित्यही मिळत नव्हते. तरीही मिळेल त्या साहित्याची जमवाजमव करून रोबोटिक कोव्हीड – 19 वॉर बॉटची निर्मिती केली.

हा रोबोट वापरण्यास अगदी सोपा आहे. यात काढण्यायोग्य 3 कंपार्टमेंट्स आहेत. ते वापरल्यानंतर स्वच्छ केल्या जाऊ शकतात. हा वॉर बॉट अनेक मित्राच्या अंतरावरून मोबाईलच्या साहाय्याने ऑपरेट केला जाऊ शकते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.