Pune Warriors : पुणे वॉरियर्सचा विजय, तर सिटी एफसीची ईगलशी बरोबरी

एमपीसी न्यूज : पुणे वॉरियर्सने पीडीएफए (Pune Warriors) फुटबॉल लीग स्पर्धेत एएफए सॅमफोर्डचा पराभव केला, तर सिटी एफसी पुणेला ईगल एफसीविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले. रविवारी झालेल्या 16 वर्षांखालील गटाच्या सामन्यात गोलचा पाऊस पडला.

तृतीय श्रेणी गटातील लढतीत पुणेरी वॉरियर्सने एएफए सॅमफोर्डचा 7-1 असा धुव्वा उडवला. अनिकेत गुप्ता (23वे मिनिट), रोहन राऊत (45 वे मिनिट), विवेक घलांड (49 वे मिनिट), प्रसाद नाईक (52 वे मिनिट), पियुष कुलकर्णी (54 वे मिनिट), संकेत डोंगरे (57 वे मिनिटे-पेनल्टी), शंतनु खानापुरे (60 वे मिनिट) यांनी एकेक गोल करून संघाचे गोलाधिक्य वाढवले. एएफए सॅमफोर्डकडून नेल्सन पास्ते याने 61 व्या मिनिटाला एकमात्र गोल केला. 

जी गटातील सामन्यात सीटीएफसी पुणे आणि ईगल एफसी या प्रतिस्पर्धी संघांकडून हॅट्रिकची नोंद झाल्यानंतरही सामना 3-3 असा बरोबरीत सुटला. दुर्वेश वाळकेने 8, 15 आणि 48 व्या मिनिटाला सीटीएफसीसाठी हॅट्रिक केली. त्या नंतर ईगलकडून जतिंदर चौहान याने 28, 54 आणि 63 व्या मिनिटाला हॅट्रिक पूर्ण केली. 

Pune District Football Association : साई स्पोर्टस, बेटा संघांचा संघर्षपूर्ण विजय

पुणे पायोनिर्स एफसी संघाने चुरशीने झालेल्या सामन्यात ब्लॅकहॉक्सचा 3-2 असा पराभव केला. मिका शेख याचे दोन गोल त्यांच्या विजयात निर्णायक ठरले. सार्थ कांबळेने तिसरा गोल केला. ब्लॅकहॉक्स संघांच्या यश भोईर आणि प्रतिक शिंघे यांनी गोल केले. 

‘अ’ गटातील सामन्यात परशुरामियन्स एससी ‘ब’ संघाने हायलॅंडर्स एफसीवर 2-0 असा विजय मिळविला. उझेर बारी आणि सारंग दातार यांनी गोल केले.

एसएसपीएमएस मैदानावरील 16 वर्षांखालील गटाच्या सामन्यात चार सामन्यातून 26 गोलची नोंद झाली. क्रीडा प्रबोधिनी संघाने सिटी एफसीचा 9-0, लौकिक एफएने 4 लायन्स एफएवर 6-0, गेम ऑफ गोल एफसीसीने जुन्नर तालुक्याचा 6-2 आणि स्टेपओव्हर एफएने बेटा स्पोर्टसचा 5-0 असा पराभव केला. 

निकाल – Pune Warriors

गट एफ -गोल्डन फेदर्स 0 बरोबरी वि. थंडरकॅटस ब 0

पुणेरी वॉरियर्स 7 (अनिकेत गुप्ता 23, रोहन राऊत 45, विवेक घलांड 49, प्रसाद नाईक 52, पियुष कुलकर्णी 54, संकेत डोंगरे 57, शंतनु खानापुरे 60 वे मिनिट)वि.वि. एफए सॅमफोर्ड 1 (नेल्सन पास्टे 61वे मिनिट)

गट जी – पुणे पायोनिर्स एफसी 3 (माका शेख 49, 62वे मिनिट, सार्थ कांबळे 540वे मिनिट) वि.वि. ब्लॅकहॉक्स 2 (यश भोईर 32वे, प्रतिक शिंघे 47वे मिनिट)

सिटी एफसी 2 (दुर्वेश वाळके 8, 15, 48वे मिनिट) बरोबरी वि. ईगल एफसी 2 (जतिंदर चौहान 28, 45, 60+03रे मिनिट)

गट अ – परशुरामियन्स एससी ब 2 (उझेर बारी 43वे, सारंग दातारप 48वे मिनिट) वि.वि. हायलॅंडर्स एफसी 0

एसएसपीएमएस मैदान – 16 वर्षांखालील

गट ब – क्रीडा प्रबोधिनी 9 (जॉय शेळके 4थे, साई पाटिल 9, 17, 27, 55वे, राज पाटिल 28वे, अर्जुन दांडगे 45वे, आयन शेख 50वे, 52वे मिनिट) वि.वि. सिटी एफसी पुणे 1 (प्रथमेश सागर 24वे मिनिट)

गट अ – स्टेपओव्हर एफए 5 (जसवीर सिंग धिल्लॉं 9वे, रोहन कट्याळ 30वे, 30+1ले मिनिट, साहिल बेल्लारा 40वे, रोहन उत्तेकर 44वे मिनिट) वि.वि. बेटा स्पोर्टस क्लब 0

गेम ऑफ गोल एफसीसी 6 (वरद विनोद 7, 8, 12 सोहम चांदपुरे 30, 44, मल्हार दरेकर 34वे मिनिट) वि.वि. जुन्नर तालुका 2 (विरेंद्र कुटे 1ले, 40वे मिनिट)

गट सी लौकिक एफए 6 (सोहम सागर 5वे, अस्मय गायकवाड 26, 30वे, आदित्य कांबळे 54वे, सोहम नामजोशी 57, 59वे मिनिट) वि.वि. 40लायन्स एफए 0

गट सी – यंग स्टेप्स एफए 2 (कृणाल मोरे 34वे, संतोष नांदवे 60+3रे मिनिट) बरोबरी वि. पुणे पायोनिर्स 2 (अथर्व खडतरे 16, 54वे मिनिट)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.