Pune : पुण्याची वैभवशाली गणेश विसर्जन मिरवणूक पहा ‘एमपीसी न्यूज’वर लाईव्ह

एमपीसी न्यूज – पुण्यातील (Pune) सुप्रसिद्ध आणि वैभवशाली परंपरा असलेली गणेशोत्सव मिरवणूक ‘एमपीसी न्यूज’च्या फेसबुक पेजवर लाईव्ह पाहता येणार आहे. लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता आणि कुमठेकर रस्ता या मुख्य ठिकाणची मिरवणूक ‘एमपीसी न्यूज’च्या फेसबुक पेजवर घरबसल्या पाहता येणार आहे. गुरुवारी (दि. 28) सकाळी अकरा वाजल्या पासून हे प्रक्षेपण सुरू होणार आहे.
https://www.facebook.com/mpcnews.in?mibextid=ZbWKwL
बाप्पा माझा, पुणे प्रस्तुत ‘पुढच्या वर्षी लवकर या’ या कार्यक्रमात पुण्यातील सुप्रसिद्ध गणेशोत्सव मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. मिरवणुकीचे थेट प्रक्षेपण ‘एमपीसी न्यूज’च्या फेसबुक पेजवर तसेच बाप्पा माझाच्या फेसबुक आणि Youtube चॅनेलवर होईल. त्यासोबत सोशल मीडिया पार्टनर बिंग मराठी, चला वारीला आणि श्री देव दर्शन या फेसबुक पेजच्या माध्यमातूनही आपल्याला हा सोहळा पाहता येईल.
महावीर ब्युटी सेंटर- शर्मा जी कि दुकान, पेटल्स NX, लक्ष्मी रोड, पुणे तसेच बायजूस ट्युशन सेंटर, कोरेगाव पार्क,पुणे, महेश इंगुले फायनान्स मॅनेजर कंपनी हे या थेट प्रक्षेपणाचे प्रायोजक आहेत. अंनत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी (दि. 28) सकाळी 11 पासून ते मिरवणुक संपेर्यंत थेट प्रक्षेपण सुरु राहणार आहे.
इथले प्रक्षेपण पाहता येईल
– लक्ष्मी रस्ता (विशेष विविध कॅमेऱ्यांमार्फत)
– कुमठेकर रस्ता (पुण्यात प्रथमच थेट प्रक्षेपण)
– टिळक रस्ता (पुण्यात प्रथमच थेट प्रक्षेपण)