Pune : क्वारंटाईन सेंटरमध्ये कोरोनाबाधित महिलेसोबत अश्लील वर्तन करणारा वॉचमन गजाआड

Watchman arrested for having sex with coronated woman at quarantine center ;

एमपीसीन्यूज : कोरोनाची लागण झालेल्या महिलेसोबत क्वारंटाइन सेंटरमध्ये अश्लील वर्तन करणाऱ्या वॉचमनला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले. लोकेश दिलीप मते (वय 30) असे गजाआड झालेल्या वॉचमनचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका क्वारंटाईन केंद्रात 16 जुलै रोजी हा प्रकार घडला. एका 27 वर्षीय महिलेने या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका महाविद्यालयात क्वारंटाइन केंद्र आहे. या केंद्रात ही महिला उपचार घेत होती.

या केंद्रात फिर्यादी या एकमेव महिला रूग्ण होत्या. त्या ठिकाणी लोकेशन सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान, 16 जुलै रोजी लोकेश हा या महिलेच्या रूममध्ये गेला आणि सुरक्षेच्या कारणास्तव आलो असे सांगून तिचा मोबाईल नंबर घेतला.

रात्री एक वाजता लोकेशने फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर फोन केला आणि काही मदत लागल्यास सांगा, असा मेसेज टाकला. त्यानंतर पहाटे दोन वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत तो दरवाजा वाजवून फिर्यादी महिलेला सतत त्रास देत होता.

या दरम्यान फोनवर त्याने तिच्याशी अश्लील संभाषण केले. या सर्व प्रकारामुळे मुळे ही महिला घाबरून गेली.

दुसऱ्या दिवशी या महिलेने संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे यांना ही माहिती दिली. त्यानंतर शिंदे यांनी पोलिस आयुक्तांना पत्र व्यवहार करत कारवाई करण्याची मागणी केली.

भारती विद्यापीठ पोलिसांनी या सर्व प्रकाराची चौकशी करत फिर्यादी महिलेची फोनवरून तक्रार घेतली आणि आरोपी विरोधात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.