Pune : पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

एमपीसी न्यूज- तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि. 19) बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (दि.20) उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.