Pune : वडगावशेरी भागात पावसामुळे अनेक घरांत घुसले पाणी!; नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांच्यासह महापालिका अधिकाऱ्यांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – वडगावशेरी भगत नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे घरांत पाणी घुसले होते. नागरिकांना दिलासा देण्यासाठी नवनिर्वाचित आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पुणे महापालिका अधिकाऱ्यांनी भेट दिली.

मागील रविवारी (दि. 3 नोव्हेंबर) रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे विमाननगर, वडगावशेरी, खराडी भागात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी रस्त्यावर साठले. अनेक घरांमध्ये पाणीही शिरले होते. सोमनाथनगर, तुळजाभवानी नगर, विडी कामगार नगर इत्यादी भाग प्रभावित झाला होता. अनेक सुरक्षा भिंती पडल्या होत्या. याची गांभीर्यता लक्षात घेता आज सकाळी तातडीची जागा पाहणी ठेवण्यात आली होती.

पुणे महानगरपालिकाकडून मलःनिसरण खात्याचे मुख्य अभियंता व्ही. जी. कुलकर्णी, उप अभियंता रविंद्र मुळे, नगररोड क्षत्रिय कार्यालयचे उप अभियंता सोपानराव पगारे व प्रायमो सल्लागार उपस्थित होते. बाधित असलेल्या शुभम सोसायटी, गार्डेनिया सोसायटी, उजवल सोसायटी तसेच खराडीमधील फाॅरेस्ट काउंटी सोसायटीमधील पाहणी करण्यात आली.

संबंधित अधिकाऱ्यांनाही वस्तुस्थिती लक्षात आल्याने भविष्यात आशी पूर परिस्थिती होऊ नये, यासाठी पावसाळी लाईन, कल्वर्ट पाईची रुंदी वाढविणे व ड्रेनेज लाईनची रुंदीकरण करुन नव्याने लाईन टाकणार, तसेच नाळे रुंदीकरण व त्यावर असणारे अडथळे त्वरीत दूर करणार, यासाठीचा प्रस्ताव लवकरच महानगरपालिकेकडे सादर करणार, असे मुख्य अभियंता व्ही.जी. कुलकर्णी यांनी सांगितले.

यावेळी नगरसेवक महेंद्र पठारे, नगरसेविका सुमनताई पठारे, नगरसेवक भैयासाहेब जाधव, समाजसेवक अॅड सतिशजी मुळीक,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहरचे उपाध्यक्ष नारायण गलांडे, ज्येष्ठ नेते भीमराव गलांडे, माऊली कळमकर, उषा कळमकर, सुनिल पठारे, धिरज पठारे, सोमनाथ साबळे, किरण खैरे, राकेश म्हसके, सुहास तळेकर, नितीन मेमाणे,  वैभव पंचमूख, प्रमोद पवार, शशी काथोरे, सुमित खेडकर, सतिश धापटे, अभिजीत सागडे, सुमित भोसले आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.