Pune : धायरी परिसरामध्ये पाणी टंचाई; दिवसआड होतोय पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज – धायरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई भासत आहे. नागरिकांना भेडसावणारी पाणीटंचाई दूर करण्यासाठी या भागाला एक दिवसआड पाणीपुरवठा केला जातो. यासाठी ग्रामपंचायत काळात बारांगणी मळा विहिरीवरून आणलेल्या बंदिस्त जलवाहिनीचा वापर केला जातो.

परिसरात बहुमजली इमारती असल्याने प्रत्येक भागास 45 मिनिटे ते 1 तास पाणी वितरित करण्यात येते. मात्र, हे पाणी पुरत नसल्याने या भागातील नागरिकांनी स्वारगेट पाणीपुरवठा विभागावर मोर्चा काढला होता. त्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी या परिसराची पाहणी करून या भागात नव्याने टँकर पाईट निर्माण करण्याची घोषणा केली होती.

त्यानुसार धायरी फाटा येथे अस्तित्वात असलेल्या पंपिंगमधून कनेक्शन घेऊन टँकर पॉईंट तयार करण्यात आला आहे. या टँकर पॉईंटवरून सद्यस्थितीत पालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. धायरी आणि परिसरात अनेक खासगी टँकरधारक असून त्यांच्याकडून पालिकेच्या नवनिर्मित टँकर पॉईंटवरून त्यांना पाणी भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.