_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Pune Water Supply News : पुणे शहरात गुरुवारी पाणी पुरवठा बंद तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा

एमपीसी न्यूज : शहरातील पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी, वारजे आणि होळकर या जलकेंद्रांमध्ये काही दुरुस्ती कामांमुळे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी दिनांक 20 मे रोजी बंद राहणार आहे. तसेच, शुक्रवारी दिनांक 21 मे रोजी उशिरा आणि कमी दाबाने पाणी सोडण्यात येणार आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा परिसर
पर्वती जलकेंद्र भाग : शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकूंदनगर, पर्वतीगाव, सहकारनगर, सातारा रोड, पद्मावती, बिबवेवाडी, तळजाई, कात्रज, धनकवडी, इंदिरानगर, कर्वे रोड ते एसएनडीटी, एरंडवणा, संपूर्ण कोथरूड, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, लॉ कॉलेज रोड, सेमिन्नरी झोन, मिठानगर, शिवनेरीनगर, भाग्योदयनगर, ज्ञानेश्‍वरीनगर, साईबाबा नगर, सर्व्हे नंबर 42. 46, कोंढवा खुर्द, पर्वती टँकर भरणा केंद्र, पद्मावती टँकर भरणा केंद्र या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

वडगाव जलकेंद्र परिसर : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र परिसर : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी, वारजे जलशुद्धीकरण परिसर, औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

नवीन होळकर पंपिंग परिसर : विद्यानगर, टिंगरेनगर, कळस, धानोरी, नगर रोड,लोहगाव, मुळा रोड,

लष्कर जलकेंद्र परिसर : लष्कर भाग, पुणे स्टेशन, मुळा रस्ता, कोरेगाव पार्क, ताडीवाला रोड, रेसकोर्स, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, नगररस्ता, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड कॉलनी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी

भामा असखेड जलशुद्धीकरण केंद्र परिसर : विश्रांतवाडी, वडगाव शेरी, येरवडा, विश्रांतवाडी, विमाननगर, कल्याणीनगर, फुलेनगर, या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.तर शुक्रवारी कमीदाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.