Pune : शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार

एमपीसी न्यूज- वारजे जलकेंद्र आवारातील मुख्य वाहिनी नादुरुस्त झाल्याने उद्या, गुरूवारी (दि. ५) शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. या दुरुस्तीमुळे चांदणी चौक टाकीला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार असून, पर्यायाने पाषाण पंपींगही बंद राहणार आहे. अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

पाणीपुरवठा बंद राहणारा भाग – उजवी-डावी भुसारी कॉलनी, परमहंस नगर, भूगाव, बावधन, पाषाण, शास्त्रीनगर, सूस टाकी, पाषाण गावठाण, सुतारवाडी, बालेवाडी, म्हाळुंगे, विधाते वस्ती, मुरकुटे वस्ती, सूस गाव, मोहननगर आणि परिसर.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.