Pune : शहराला पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करा, महापौर टिळक यांचे प्रशासनाला आदेश

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरणात पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. यामुळे धरणात समाधानकारक पाणीसाठा आहे. हे लक्षात घेता शहराला पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच कोणत्याही प्रकारची कपात होणार नाही. याबाबत काळजी घ्यावी, असे आदेश महापौर मुक्ता टिळक यांनी आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाणीपुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना दिले आहेत. महापौरांच्या या आदेशामुळे पुणेकर नागरिकाची पाणी कपातीमधून सुटका झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुणे शहराला खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या चार धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या चारही धरणातील पाणीसाठा लक्षात घेता महापालिका प्रशासनाने मागील सहा महिन्यापासून पुणेकर पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

  • तर या पाणी प्रश्नावर शहरातील विविध संघटनी पुणे महापालिकेच्या बाहेर आंदोलन देखील केले. तरी देखील पाणी प्रश्नावर तोडगा काही निघाला नाही. या सर्व घडामोडी घडत असताना. पुणे महापालिकेच्या सभागृहात नागरिकांना पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी केली. त्यावर महापौर मुक्ता टिळक यांनी पाणी पुरवठा अधिकारी व्ही. जी. कुलकर्णी यांना खुलासा करण्यास सांगितला.

धरणातील पाणी साठयाबाबत दिलेल्या आकडेवारी वरून महापौरांनी धरणातील पाणी लक्षात घेता पुणेकर नागरिकांना पूर्वीप्रमाणे पाणी पुरवठा करावा, असे आदेश देण्यात आले. शहरातील नागरिकांची पाणी कपातीमधून सुटका होणार असल्याने नागरिकांसाठी ही आनंदाची बाब म्हणावी लागेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.