Pune Water Supply : पुण्यात गुरुवारी ‘या’ परिसराचा पाणी पुरवठा राहणार बंद !

एमपीसी न्यूज : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वडगाव जलकेंद्र, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र आणि चतु:श्रृंंगी पंपिंग स्टेशन येथील विद्युत, पंपींग विषयक, स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे गुरुवारी (दि.11 फेब्रुवारी) या भागातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे.

तसेच शुक्रवारी (दि.12) शहरात उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

गुरुवारी खालील भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद

वडगाव जलकेंद्र : हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा बुद्रुक या परिसराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे.

चतु:शृंगी, एसएनडीटी, वारजे जलकेंद्र : पाषाण, औंध, बोपोडी, खडकी, चतु:शृंगी, गोखलेनगर, जनवाडी, रेंजहिल्स, बावधन, बाणेर, चांदणी चौक, किष्किंदानगर, रामबाग कॉलनी, डावी उजवी भुसारी कॉलनी, धनंजय सोसायटी, एकलव्य कॉलनी, महात्मा सोसायटी, गुरू गणेशनगर, पुणे विद्यापीठ, वारजे हायवे, वारजे माळवाडी, रामनगर, अहिरेगाव, पॉप्युलरनगर, अतुलनगर, शाहु कॉलनी.

वारजे जलशुद्धीकरण : औंध बावधन, सूस, सुतारवाडी, भूगाव रोड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.