BNR-HDR-TOP-Mobile

Pune : पाणी बंद केलेले माहित नाही मग मंत्री कशाला झालात ? चेतन तुपेंचा शिवतारेंना सवाल

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – पाटबंधारे विभागातर्फे पुणे महापालिका ठरवून दिलेल्या कोट्यापेक्षा अधिक पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्यावर बुधवारी (10 ऑक्टोबर) दुपारी 4 वाजता पालिकेस दिले जाणारे पाणी बंद करण्यात आले आहे. त्यामुळे गुरुवारी (11 ऑक्टोबर) शहरातील पूर्व भागाला कोणतीही कल्पना न देता पाणी मिळालेले नाही. यावर स्पष्टीकरण देताना राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी हे पाणी बंद केलं की नाही याबाबत माहिती घेतो मात्र पुणेकरांनी नियमानुसारच पाणी घ्यायला हवं अस वक्तव्य केलं आहे. यावर आता महापालिकेतील विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी विजय शिवतारेंना चांगलच फैलावर घेतलं आहे.

सणासुदीच्या दिवसात महानगर पालिकेला कोणतीही पूर्व सुचना न देता अशा पद्धतीने पाणी कपात करण्याचे कारण काय ? असा सवाल करत महानगर पालिकेच्या इतिहासातील आजचा दिवस हा काळा दिवस म्हणून लिहिला गेलाय. महापालिकेच्या स्थापनेपासून ऑक्टोबर महिन्यात पाणी कपात करण्याची दुर्दैवी वेळ आजपर्यंत आली नव्हती असा टोला लगावत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पाणी बंद केल्याचे माहित नाही मग मंत्री कशाला झाला ? असा थेट सवाल करत चेतन तुपे यांनी जोरदार हल्लबोल केला.

दरम्यान, शहराला होत असलेल्या पाणी पुरवठ्यात कपात करून दरडोई साडेअकराशे एमएलडी पाणी पुरवठा करण्याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र शहरासाठी सोळाशे एमएलडी पाणी लागत असल्याने महापालिकेला पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. याच्याच विरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे महापालिकेसमोर जोरदार निदर्शने करण्यात आले.

.

HB_POST_END_FTR-A1
.