Pune : शहराचा गुरुवारी दिवसभरासाठी पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज – पुणे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पर्वती, वडगाव, लष्कर, एसएनडीटी वारजे आणि नवीन होळकर या सर्व जलकेंद्र वरील पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराचा गुरुवारी (16 मे 2019 रोजी) दिवसभर पाणीपुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून दिली आहे.

तसेच दुसर्‍या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.