Pune Water : दर महिन्याला पाणी पुरवठा बंद का? सजग नागरिक मंचचा पुणे महापालिकेला सवाल

एमपीसी न्यूज – पुणे महापालिका (Pune) सध्या कंबर कसून जी 20 साठी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला दर महिन्याला देखभाल दुरुस्तीचे कामे सांगत पाणी पुरवठा विभाग, मात्र पाणी पुरवठा बंद करत आहेत. ही कुठली पद्धत आहे? असा सवाल सजग नागरी मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी पत्रकाद्वारे महापालिका प्रशासनाला विचारला आहे.
महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या जी-20 साठी पुणे शहरात दाखल झालेल्या देशोदेशीच्या पाहुण्यांना पुण्यातील विविध विकास कामांचे सादरीकरण महापालिका करत आहे. पण त्याबरोबरीने पाणीपुरवठा विभागाने देखभाल दुरुस्तीसाठी येत्या गुरुवारी (दि.19) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. जी 20 मधील कोणत्याच देशात अशी पद्धत अस्तित्वात नसेल. अशी पद्धत आलेल्या पाहुण्यांना दाखविल्याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन.
Pune : कै.मे.ना.वा.खानखोजे 2023 चित्रकला स्पर्धेत रंगात रमली मुले
नागरिकांना पाणी बचतीसाठी प्रोत्साहित करणारी ही योजना नक्कीच देशोदेशीचे पाहुणे आपापल्या देशात राबवतील आणि पुणे महापालिकेच्या कल्पकतेचे प्रदर्शन संपूर्ण जगाला घडेल. दर महिन्याला देखभाल दुरुस्तीसाठी महिन्यात किमान एकदा तरी पाणीपुरवठा बंद ठेऊन नक्की देखभाल दुरुस्ती काय केली जाते? असा सवाल नागरिक विचारत आहेत. पाहुणे तुपाशी अन जनता उपाशी ठेवू नये अशी मागणीही वेलणकर यांनी केली आहे.