Pune : आम्ही ‘बॅलेट पेपर’वर देखील निवडणूक लढवायला तयार – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – निवडणूक कशी घ्यायची? हे आंदोलनाने ठरवता येत  नाही. याचा निर्णय निवडणूक आयोग घेत असतो.  त्यामुळे निवडणूक आयोग जो निर्णय घेईल त्यावर आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत. अगदी बॅलेट पेपरवर देखील, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. पुण्यात पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात पाटील बोलत होते.

यावेळी पाटील म्हणाले, आमच्या पक्षात अनेकजण येत आहेत. त्यामुळे आम्ही स्वतःच्या हिमतीवर आगामी विधानसभा निवडणुक लढणार असल्याचा चर्चा सुरू आहेत. आमचे 200 आमदार जरी निवडून येणार असले तरी आम्ही स्वतंत्र न लढत शिवसेनेला सोबत घेऊनच विधानसभा निवडणुकीला सामोरे जाणार आहे.

  • महाराष्ट्राची 11 कोटी लोकसंख्या आहे. त्यातील सुमारे 4 कोटी मतदार आहेत. सध्या राज्यात भाजपचे 1 कोटी 21 लाख सदस्य आहेत .लवकरच यात आणखी 35 लाखाची भर पडणार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला 22 कोटीहुन अधिक मतदान झाले आहे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.