Pune : शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रो होऊ देणार नाही म्हणणाऱ्या दीपक मानकरांचे तुम्ही काय केले?

काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी झाल्याशिवाय मेट्रोचे काम होऊ देणार नाही, असे म्हणणाऱ्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांचे तुम्ही काय केले? असा गंभीर आरोप काँगेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी भाजपवर केला. त्यामुळे सभागृहात काही वेळ शांतता निर्माण झाली होती.

मुख्यमंत्र्यांनी 2 वर्षांपूर्वी पुणे महापालिकेची भव्य अशी शिवसृष्टी बिडीपीच्या 50 एकर जागेत उभारणार असल्याचे जाहीर केले होते. आज सर्वसाधारण सभेत शहरी गरीब वैद्यकीय योजनेसाठी शिवसृष्टीसाठीची 10 कोटी रक्कम वर्गीकरण करण्याचा विषय होता. त्यामुळे भाजपला शिवसृष्टी करायचीच नाही, असा हल्लाबोल काँगेस – राष्ट्रवादीने केला. आमचा शहरी गरीब योजनेला विरोध नाही. पण, शिवसृष्टीचीच रक्कम का घेतली? असा सवाल उपस्थित करण्यात आला.

_MPC_DIR_MPU_II

शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत. त्यांच्या नावाने काहीही आपण केले नाही, याचे दुःख आहे. कचरा डेपोची जागा मेट्रोला देण्यात आली. तुम्हाला शिवसृष्टी करायचीच नाही, त्याचे केवळ राजकारण करत आहात, आशा शब्दांत स्वीकृत नगरसेवक सुभाष जगताप यांनी भाजपवर हल्लाबोल केला. शिवसृष्टी कधी होणार, केवळ घोषणा करायचे काम सुरू आहे, असे शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार म्हणाले.

शिवसृष्टी होणारच असून, त्यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात येईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सांगितले. तर, बिडीपीच्या जागा ताब्यात घेणे अवघड असून, शिवसृष्टी तुम्हाला करायचीच नाही, असे विरोधी पक्षनेते दिलीप बराटे म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.