BNR-HDR-TOP-Mobile

Pune : बारामतीमध्ये आमची थोडीशी ताकद कमी पडली – गिरीश बापट

एमपीसी न्यूज – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशभरातील जनतेने चांगली साथ दिली असून त्याच प्रमाणात पुणे जिल्ह्यात देखील दिली आहे. मात्र, यामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात आमची थोडी ताकद कमी पडली, असे स्पष्टीकरण पुणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी देत त्यांनी जिल्ह्यातील राजकीय घडामोडीबाबत देखील त्यांनी भाष्य केले. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी गिरीश बापट म्हणाले की, पुणे जिल्ह्यात मागील निवडणुकीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत देखील प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा उमेदवाराला पाठिंबा मिळाला आहे. मात्र, जिल्ह्यातील मावळ लोकसभा निवडणुकीतील प्रत्येक भाषणात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे प्रचंड मतांनी निवडून येतील, असे सांगितले होते.

  • तर, ज्या उमेदवाराला किंवा व्यक्तिला राजकीय परिपक्वता नसताना तो कोणाचा नातू किंवा मुलगा आहे? म्हणून त्याला राजकारणात स्थान द्यायचे हे योग्य ठरणार नाही. त्यासाठी त्याला स्वतःला पुढे येऊन सिद्ध करावे लागणार आहे, असे विधान करीत मावळ लोकसभा मतदारसंघातून प्रथमच पार्थ पवार यांनी निवडणूक लढविली. आणि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

या पार्श्वभूमीवर गिरीश बापट यांनी हाच धागा पकडत शरद पवार आणि अजित पवार यांचे नाव न घेता टोला लगावला. तर, राजकारणात नगरमधून सुजय विखे यांनी स्वतः सिद्ध केल्याचे सांगत त्यांचे कौतुक देखील केले.

  • आता पालकमंत्री कोण असणार? त्यावर ते म्हणाले की, माझ्यापेक्षा चांगल काम करणार पालकमंत्री तुम्हाला मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
    कसबा विधानसभा मतदारसंघाचा उत्तरधिकारी कोण असेल त्यावर ते म्हणाले की, आजवर राजकीय जीवनातील प्रत्येक निर्णय सर्वाना बरोबर घेऊन घेतला आहे. त्यामुळे कसबयाचा उत्तराधिकारी निवडण्याचा निर्णय देखील सर्वानी मिळून घेऊ आणि लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मला 11 हजार 500 मते कमी मिळाले -गिरीश बापट
पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चौथ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी पार पडली. महायुतीकडून गिरीश बापट आणि आघाडीकडून मोहन जोशी हे निवडणुकीच्या रिंगणात होते. या निवडणुकीत गिरीश बापट यांना 6 लाख 32 हजार 835 आणि मोहन जोशी यांना 3 लाख 8 हजार 207 मते मिळाली. या आकडेवारीवरून गिरीश बापट हे तब्बल 3 लाख 24 हजार 628 मतांनी विजयी झाले. मात्र, यामध्ये गिरीश बापट यांनी मतदान झाल्याच्या दुसर्‍या दिवशी त्यांचे सहकारी आणि मित्र परिवाराशी आपल्याला किती मते मिळतील? याबाबतची आकडेमोड केल्यावर त्यांना 6 लाख 44 हजार 500 मते मिळतील. अशा स्वरूपाचा आकडा त्यांनी एका कागदावर त्यावेळी लिहून ठेवला होता. त्या आकडेवारीचा कागद गिरीश बापट यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पुढे आणून मला 11 हजार 500 मते कमी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारची आकडेमोड मी प्रत्येक निवडणुकीत करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

  • तर, गिरीश बापट यांच्या आकडेवारीवरुन 2017 च्या निवडणुकीत भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपचे 90 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील, असे भाकित केले होते आणि 98 नगरसेवक महापालिकेच्या सभागृहात निवडून देखील आले. आता गिरीश बापट यांच्या कागदावरील आकडेवारीमुळे हे खासदार देखील चर्चेत राहिले आहे.

Advertisement