Pune : चंद्रकांत पाटील यांना ‘भोकरदन’मधून निवडणूक लढविण्याची केली होती विनंती – रावसाहेब दानवे

एमपीसी न्यूज – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना माझा जालना जिल्ह्यातील भोकरदन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती केली होती. एकदा परत आल्यावर पुन्हा यावे लागणार नाही, असेही त्यांना सांगितले होते. पण, पाटील यांनी कोथरूडची निवड केल्याचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

मागील 12 वर्षांपासून पाटील हे पुणे पदवीधर मतदारसंघातून आमदार आहेत. ते काही केरळमधील चिकमंगळूर वरून आले नाही. त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केली.

आमचा पक्षाचे कृष्णराव भेगडे यांना 70 हजार रुपयांचा घोटाळा केला म्हणून शरद पवार यांनी फोडले होते. 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याने अजित पवार तुम्हालाही कारागृहात जावे लागणार आहे, असा इशारा दानवे यांनी दिला.

दानवे म्हणाले, त्यांचा पक्षातील नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत असताना ईडीचा चौकशीने घाबरून प्रवेश होत असल्याचे सांगण्यात येते. पण, आमचा पक्षाचे धनंजय मुंडे यांना कशाचा जोरावर फोडले?, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गणेश नाईक, छगन भुजबळ यांना कोणत्या ‘ईडी’चा धाक दाखविला?. काँगेस हे डुबत जहाज आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी हा पक्ष संपविणार आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शरद पवार यांचा घरातील कलह मिटला नाही. आमचा मुखमंत्र्यांवर टीका करताना पवार यांनी पातळी सोडली आहे.

कोथरूड मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांचा प्रचारार्थ दसरा चौक बालेवाडी येथे महाजनादेश सभा आज सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खासदार गिरीश बापट, नगरसेविका स्वप्नाली सायकर, ज्योती कळमकर, प्रल्हाद सायकर, राहुल कोकाटे, गणेश कळमकर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, काँग्रेसचे माजी महापौर दत्ता गायकवाड, मानसेचे प्रचार प्रमुख विनोद मोहिते यांचा भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी गिरीश बापट म्हणाले, पुढील निवडणुकीत मतदार मेट्रोत बसून येईल. लोकसभेला मला जेवढी मते मिळाली, तेवढीच मते चंद्रकांत पाटील यांना मिळणार आहे. निवडून आल्यानंतर यापेक्षा दुप्पट सभा घेऊ.

त्यानंतर अमोल बालवडकर म्हणाले, आगामी काळात बाणेरमध्ये हॉस्पिटल उभारायचे आहे. चांदणी चौक उड्डाणपूल, शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो सुरू करण्यात येणार आहे. बाणेर – बालेवाडी – सोमेश्वरवाडी भागातून लोकसभेला 38 हजार मते दिली. त्यापेक्षा जास्त मते चंद्रकांत पाटील यांना मिळवून देणार आहे.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, पानशेत पुरग्रस्तांचा 60 वर्षांतील प्रश्न भाजपने सोडविला. या भागातून जास्तीत जास्त मतदान होणार आहे.

  • ‘पदवीधर’मधून निवडून येणे म्हणजे गोट्या खेळणे नव्हे – चंद्रकांत पाटील यांचा पवार यांच्यावर हल्लाबोल 
    पदवीधर मतदारसंघातून 12 वर्ष निवडून येतो, ही निवडणूक नव्हे तर गोट्या खेळणे आहे का? आशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. चंद्रकांत पाटील म्हणाले, मी बाहेरचा म्हणजे काय अमेरिकेतूनच आलो, असा प्रचार करण्यात आला. पवार मला वारंवार निवडणूक लढविण्याचे आव्हान देतात. मी कोणतीही निवडणूक लढली नसल्याचे ते म्हणतात. माढा मतदारसंघांत निवडणूक हरणार म्हणून पवार घरी पळाले होते, असा आरोपही त्यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1