Pune Weather : आज पुण्यात कमाल 39 अंश सेल्सिअस तापमान; तर संध्याकाळी मेघगर्जनेची शक्यता

एमपीसी न्यूज : भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार (Pune Weather) आज पुण्यात कमाल 39 अंश सेल्सिअस तर किमान 20 अंश सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे. तर, संध्याकाळच्या वेळी मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

पुण्यात वातावरण बदलामुळे होणाऱ्या अपघातांच्या दृष्टीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. आजही संध्याकाळी मेघगर्जना, विजा आणि सोसाट्याचा वारा येऊ शकतो. हवामान खात्याने एका अॅडव्हायझरीमध्ये नागरिकांना अशा कालावधीत मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरू नयेत असा सल्ला दिला आहे.

नागरिकांनी झाडांखाली आश्रय घेणे टाळावे व वाहने चालवताना सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Chakan : चाकण पतसंस्था निवडणूक झाली एकतर्फी

दुपारच्या वेळी तापमानात होणारी वाढ लक्षात घेता, नागरिकांना त्या वेळेत घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुण्यातील काही भागात हलका पाऊस पडू शकतो, असे आयएमडीने (Pune Weather) सांगितले. गेल्या आठवड्यातील पाऊस आणि गारपिटीनंतर चालू आठवडा बहुतांश कोरडा राहण्याचा अंदाज आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.