Pune : गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या निर्णयाचे स्वागत – गोपाळ तिवारी

एमपीसीन्यूज : सार्वजनिक गणेशोत्सव यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय झाला, त्याचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केली आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव  मंडळांनी व्यापक भूमिका घेतली, ती सद्यस्थितीत योग्य आहे.  सामाजिक ऐक्य साधण्याची दिशा देशाला, पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिली.

पुणे शहरातील गणेशोत्सव मंडळांची बांधिलकी ही समाजाप्रती प्रथम आहे हे यानिमित्ताने पुन्हा दाखवून दिले आहे. गणेशोत्सव मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांना कोरोनाच्या संकटाचे निवारण होईपर्यंत जागरूक रहावे लागणार आहे.

या संकटाचा तडाखा सर्वच घटकांना बसला आहे, याकरिता उत्सव काळातही मंडळांनी सामान्य लोकांसाठी धान्य वाटप, अन्नदान, रक्तदान असे समाजोपयोगी उपक्रम राबवावेत, असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.