Pune : ‘नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी’च्या निर्णयाचे स्वागत : जगदीश मुळीक

सरकारच्या या निर्णयामुळे नवीन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल. : Welcome to the decision of the National Recruitment Agency: Jagdish Mulik

एमपीसी न्यूज – केंद्र सरकारने दि. 19 ऑगस्ट रोजी सरकारी नोकरी करण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी एक अतिशय महत्वाचे आणि सुविधाजनक पाउल उचलत राष्ट्रीय भरती संस्था म्हणजेच नॅशनल रिक्रूटमेंट एजन्सी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबद्दल पुणे शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष जगदीश मुळीक यानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे वर्षभर वेगवेगळ्या खात्याच्या वेगवेगळ्या परीक्षा, त्याच्या एकत्र येणाऱ्या तारख आणि त्याची वेगवेगळी केंद्रे असल्याने उमेदवारांना धावपळ करावी लागायची. विशेषता ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागात येऊन त्या परीक्षा देने अवघड व्हायचे.

म्हणून हा घोळ संपवण्याकरीता सरकारने हा अतिशय सकारात्मक निर्णय घेतला आहे. यामुळे आता उमेदवारांना त्यांच्या जिल्ह्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही. सरकारच्या या निर्णयामुळे नवीन सरकारी नोकरी मिळवणाऱ्या उमेदवारांना होणारा त्रास कमी होईल.

तसेच भरती प्रक्रियेसाठी सरकारी यंत्रणेवर येणारा त्रासही कमी होईल. लोकाभिमुख सरकार म्हणजे नेमके काय हे पंतप्रधान मोदींनी अनेक निर्णयामुळे सिद्ध केले आहे. त्यातीलच हा एक निर्णय आहे.

पुणे भाजपाच्या वतीने या निर्णयाचे स्वागत आणि मोदी सरकारचे जाहिर अभिनंदन करीत असल्याचेही मुळीक यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.