Pune: शाब्बास रे पठ्ठ्या! कोरोना पॉझिटिव्ह आजींना पाठीवर उचलून रुग्णालयात केलं दाखल

Pune: Well done! Elderly Corona Patient was carried on his back and admitted to the hospital नीलेश पवार हा तरुण पीपीई किट घालून आला मदतीला धावून

एमपीसी न्यूज – कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लागण होऊ शकते हे माहीत असतानाही पुण्यातील एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालत एका वयोवृद्ध कोरोनाबाधित महिलेला स्वतःच्या पाठीवर उचलून घेत  रुग्णालयात दाखल केले. पुण्यातील पर्वती येथील जनता वसाहत येथे शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार घडला. नीलेश पवार असे या तरुणाचे नाव आहे. 

पर्वती जनता वसाहत येथील एक वृद्ध महिला घरात तापाने फन फणलेली आहे व ती कोरोना पॉझिटिव्ह आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाला समजले. परंतु डोंगरावर बारीक गल्लीतून स्ट्रेचरवर घेऊन जाणे आणि पुन्हा सुरक्षित घेऊन येणे हे अत्यंत जोखमीचे होते. त्यात कोरोनाचा रुग्ण म्हटल्यावर मदतीलाही कुणी येईना. बराच वेळ झाला. रुग्णवाहिका गल्लीत येऊन थांबलेली, परंतु त्या महिलेला खाली आणायचे, कसे हा प्रश्न निर्माण झाला.

याच परिसरात राहणाऱ्या नीलेश पवार या तरुणाला हा प्रकार समजला. त्याने पुढाकार घेत वेळ न दवडता पीपीई किट अंगावर चढवला. आणि उंच डोंगरावर जाऊन त्या कोरोना पॉझिटिव्ह आजीला स्वतच्या पाठीवर बसवून खाली घेऊन आला. ही महिला पॉझिटिव्ह आहे हे माहीत असतानाही तसेच तिच्यामुळे आपल्यालाही कोरोनाची बाधा होऊ शकते, हे माहीत असतानाही नीलेशने पुढाकार घेत खाली आणले आणि रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.