Pune : कोविड योध्दा कोणाला म्हणायचे, स्पष्टता नसल्याने 7 कर्मचाऱ्यांचे विमा प्रस्ताव प्रलंबित

कोरोना योद्धयांच्या कुटुंबामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. : What to call a covid warrior, insurance proposal of 7 employees pending due to lack of clarity

एमपीसी न्यूज – कोविड योध्दा कोणाला म्हणायचे, याची स्पष्टता नसल्याने पुणे महापालिकेच्या 7 कर्मचाऱ्यांचे विमा प्रस्ताव प्रलंबित आहे. या कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठवून एक महिना उलटला तरी कुठलाच प्रतिसाद मिळत नाही. त्यामळे कोरोना योद्धयांच्या कुटुंबामध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारने कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होणाऱ्या कोविड योद्ध्यांचा कोरोनाची बाधा होऊन मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयांचे विमा कवच जाहीर केले, विमाही उतरविला.

त्यानंतर पुणे महापालिकेने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाबाधा होऊन मृत्यू आल्यास त्याच्या कुटुंबियांना 25 लाख रुपये आणि एकाला नोकरी किंवा 50 लाख रुपये कामगार कल्याण निधी मधून आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले.

महापालिकेत आतापर्यंत 391 अधिकारी व कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले असून, 21 जणांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.

प्रशासकीय स्तरावर कोविड योध्दे म्हणायचे कोणाला, केंद्र सरकारने नेमका विमा कंपनीसोबत करार करताना कोणाला विमा कवच लागू होईल, याची माहिती उपलब्ध नसल्याने कोविड योद्धयांच्या वारसांना दिलासा देण्याशिवाय सध्यातरी तरी पालिका प्रशासनासमोर पर्याय नसल्याचे महापालिकेतील अधिकाऱ्याने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.