Pune : स्थायी समिती अध्यक्षांच्या बजेटमधून पुणेकरांना काय मिळणार?

एमपीसी न्यूज – पुणेकरांवर कोणतीही करवाढ न करता येत्या बुधवारी (दि. 26) स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने बजेट मांडणार आहेत. 2020 – 21 चे बजेट 7 हजार कोटींच्या आसपास जाणार असून त्यामध्ये पुणेकरांना काय मिळणार?, याची उत्सुकता लागली आहे.

मेट्रो, 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, बालगंधर्व पुनर्विकास, शिवसृष्टी, विविध जागी प्रस्तावित उड्डाणपूल, भामा – आसखेड योजना, अशा अनेक प्रकल्पांची घोषणा भाजपने 2017 प्रथमच सत्तेत आल्यानंतर केली होती. यातील बहुतांशी प्रकल्प कागदावरच आहेत.

महापालिकेचे स्वतःचे वैद्यकीय महाविद्यालय असावे, त्या संदर्भातील प्रस्तावही शासनाकडे पडून आहे. स्थायी समिती अध्यक्ष पुन्हा काही नवीन प्रकल्पांची घोषणा करणार की जुन्याच प्रकल्पांना गती देणार?, याकडे लक्ष लागले आहे.

हेमंत रासने यांना दोन बजेट करण्याची संधी मिळणार आहे. 2019 – 2020 च्या बजेटमध्ये जवळपास दोन हजार तूट येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. नोटबंदी, जीएसटी, रेरा या लागोपाठ घेतलेल्या निर्णयामुळे बांधकाम क्षेत्रात अभूतपूर्व अशी मंदी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.