Pune : लाच घेताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने एसीबीच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज – जिल्हा अंतर्गत बदली करणे करीता तक्रारदाराकडून सुमारे वीस हजाराची लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप काशीनाथ माने (वय 51 वर्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी, वर्ग – 1 , जिल्हा परिषद पुणे, राहणार स्वागत रेसीडेन्सी नारायणी धाम, कात्रज, पुणे.) यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहाथ पकडले. याबाबत एके 33 वर्षीय आरोग्य सेवकाने तक्रार दिली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार आणि त्यांची पत्नी हे आरोग्य सेवक असून त्यांची नंदुरबार येथे जिल्हा अंतर्गत बदली करणे करीता पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी तक्ररदार यांच्याकडे सुमारे 80,000 (ऐंशी हजार) रुपयांची लाच मागितली.

  • याबाबत तेहतीस वर्षीय आरोग्य सेवक तक्रारदार यांनी पुणे येथील लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानुसार या विभागाने सापळा रचला.
_MPC_DIR_MPU_II

पहिल्या टप्प्यावर वीस हजार रुपये देण्याचे ठरले होते. पुणे येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयात आज (मंगळवारी, दि. 28) सुमारे वीस हजार रुपये घेताना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. दिलीप माने रंगेहाथ पकडले.

  • हि कारवाई पोलीस उप अधीक्षक कांचन जाधव, पोलीस नाईक माळी,  कुंभार यांनी केली.
file photo

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.