Pune : कोरोना संकट काळात खासदार गिरीश बापट कुठे आहेत; विरोधकांचा सवाल

पुणे शहरात मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. : Where is MP Girish Bapat during the Corona crisis; Opponents question

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील पाच महिन्यांपासून कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. मात्र, या संकट काळात खासदार गिरीश बापट कुठे आहेत ?, असा संतप्त सवाल विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी आज, बुधवारी पुणे महापालिकेच्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत केला.

तर, कोरोनाच्या काळात केवळ पुणे महापालिकेतर्फेच काम केले आहे. आपण 300 कोटी रुपये खर्च केले. तुम्ही खासदारांचे नाव घेतले, म्हणून मी बोलण्यासाठी उभे राहिलो आहे, असे प्रतिउत्तर स्वीकृत नगरसेवक गणेश बिडकर यांनी दिले.

त्यावर कोरोनाला रोखण्यासाठी 300 कोटी रुपये खर्च केले तर हे पैसे गेले कुठे, अशी विचारणा विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ, नगरसेवक प्रशांत जगताप, विशाल तांबे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली.

सीओईपी जम्बो कोविड सेंटर पूर्ण न झाल्याने खासदार गिरीश बापट उपोषण करणार आहेत. या सेंटरसाठी पुणे महापालिकेतर्फे पैसे दिले नाही का, असा सवाल उपस्थित करून पृथ्वीराज सुतार यांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले.

तर खासदार बापट यांची बाजू घेणारे बिडकर तुम्ही एकमेव असल्याचा चिमटा काँग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी काढला. महापौरांचा सातत्याने फोटो येत असल्याने बापट जागे झाल्याची टीकाही त्यांनी केली.

कोरोनाच्या काळात खासदार कुठे आहेत, असा संतप्त सवाल नगरसेवक योगेश ससाणे यांनी उपस्थित केला. 100 सभासदापैकी फक्त एकमेव बिडकरच बोलत असल्यासची टीका नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.

दरम्यान, आतापर्यंत तुम्ही झोपले होते का ? शासनाने हॉस्पिटल बांधले म्हणून जागे झाले का? असे पृथ्वीराज सुतार यांनी बिडकर यांना विचारले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.