_MPC_DIR_MPU_III

Pune  : भीषण आगीत महापालिकेची आरोग्य कोठी जाळून खाक; सुदैवाने जीवितहानी नाही

Where the health of the Municipal Corporation was burnt in a fierce fire; Fortunately no casualties

एमपीसीन्यूज : पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी जवळ पुणे महापालिकेच्या एका आरोग्य कोठीला आज, मंगळवारी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल आणि पोलिसांनी मिळून काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळविले. 

_MPC_DIR_MPU_IV

पुणे-सातारा रस्त्यावरील हॉटेल पंचमी जवळ महापालिकेच्या आरोग्य कोठीतून आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास धूर येऊ लागला. स्थानिक नागरिकांनी याची माहिती अग्निशमन दल आणि पोलिसांना कळवली. पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होईपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते.

_MPC_DIR_MPU_II

दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या  अग्निशमन दलाच्या जवानांनी  काही मिनिटातच आगीवर नियंत्रण मिळवले.मात्र, तोपर्यंत आरोग्य कोठडी जळून खाक झाली होती.

एरवी हा परिसर  गर्दीने गजबजलेला असतो.  परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे या ठिकाणी गर्दी नव्हती.  या दुर्घटनेत जीवित हानी टळली.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.