Pune: पुण्यात मनसेच्या मतांचा फायदा कोणाला? 

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनाशर्थ पाठिंबा मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Pune) यांनी दिला. त्यानंतर आता या पक्षाची मते कोणाला मिळणार याकडे लक्ष लागले आहे. महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी मनसेच्या मातांमुळे फायदा होणार असल्याचे सांगितले आहे. पण, पूर्वाश्रमीचे मनसेचे नगरसेवक असलेल्या रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे यांनाही ही मते मिळणार असल्याची कुजबुज सुरू आहे. 
कोणत्याही परिस्थितीत पुणे लोकसभा निवडणूक एकतर्फी होऊ देणार नसल्याचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंत मोरे यांनी निक्षून सांगितले आहे.

PCMC : होर्डिंगमुळे जिवीत किंवा वित्तहानी झाल्यास होर्डिंगधारक जबाबदार

राज यांच्या सोबत 25 वर्षे काम केल्याने लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचेही मोरे (Pune)यांनी स्पष्ट केले. 2012 मध्ये मनसेचे तब्बल 27 नगरसेवक निवडून आले होते. कै. रमेश वांजळे यांच्या रूपाने खडकवासला मतदारसंघात मनसेचा आमदारही निवडून आला होता. 2017 मध्ये मनसेचे केवळ 2 नगरसेवक निवडून आले होते. भाजपचे तब्बल 98 नगरसेवक निवडून आले होते. मनसेची पुणे शहरात मोठी ताकद आहे.

 

सध्या मुरलीधर मोहोळ, वसंत मोरे आणि रवींद्र धंगेकर यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. या तिन्ही उमेदवारांच्या प्रचाराला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज यांनी महायुतीचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मोहोळ यांना त्याचा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.