Pune : कोरोनाविषयी अफवांचे जागतिक आरोग्य संघटनेकडून खंडन

एमपीसी न्यूज – जीवघेणा कोरोना सध्या जगामध्ये धुमाकूळ घालतो आहे. ज्या झपाट्याने हा विषाणू सर्व देशात पसरतो आहे त्याच वेगाने या रोगाबद्दल काही अफवा देखील पसरत आहेत. हे खरे आहे की या रोगामुळे जगातील मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या 5000 च्या वर पोहचली आहे.  यामध्ये ज्या लोकांची रोगप्रतिकार क्षमता कमी आहे व जे लोक वयोवृद्ध आहेत त्याच रुग्णांना प्रामुख्याने कोरोनाने आपले लक्ष केल्याचे दिसते. सोशल मीडियाच्या सहज वापरामुळे कोरोना विषाणू बद्दल समाजामध्ये अफवांना पेव फुटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या आजाराला विश्वव्यापी साथ म्हणून संबोधले असले तरी हा आजार नियंत्रणात येऊ शकतो व कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊ शकतो.

 

1) चिकन, मांस व अंडी यापासून कोरोनाचा जास्त धोका – चीन मधील लोक काहीही खातात व अगोदर आलेले स्वाईन फ्लू, बर्ड फ्लू, इबोला यासारख्या आजारही चीन देशानेच जगाला  दिलेली देन होती. या आजारांना  कारणीभूत असणाऱ्या ब्रॉयलर कोंबड्या कोरोनाला देखील कारणीभूत ठरतात असा चुकीचा समज लोकांमध्ये पसरला आहे. त्यामुळे लोक चिकन, मांस, मच्छी, अंडी या सारखे वेस्टन खाण्याचे कटाक्षाने टाळत आहेत. आपल्याकडे चिकन किंवा इतर अन्न शिवजून, योग्य प्रक्रिया करूनच तयार केले जाते त्यामुळे एवढ्या उच्च तापमानाला कोणताच विषाणू तग धरू शकत नाही. त्यामुळे लोकांनी योग्य शिजवलेले व प्रक्रिया केलेले चिकन खायला काही हरकत नाही त्यापासून कोरोना होण्याचा कसलाच धोका नाही.

 

2) परदेशातून आलेला प्रत्येकजण कोरोनाबाधित असू शकतो – परदेशातून आलेल्या काही नागरिकांना सोसायट्यांमध्ये प्रवेश नाकारण्या पासून ते इतर ठिकाणी संशयित रुग्ण म्हणून बघण्याची वृत्ती बळावत आहे जी अतिशय चुकीची आहे. विमानतळावरती परदेशातून आलेल्या नागरिकांची योग्य तपासणी होत असून संशयित रुग्णांना तेंव्हांच योग्य ठिकाणी उपचारासाठी पाठवले जात आहे. भारत सरकार व राज्य सरकारची सर्व यंत्रणा हाय अलर्ट असून हा विषाणू जास्त पसरू नये म्हणून काळजी घेतली जात आहे.

 

3) सामान्य खोकला व ताप कोरोनाचीच लक्षणे आहेत – सामान्यपणे खोकला, ताप आणि श्वास घ्यायला त्रास होणे हे कोरोनाची प्रमुख लक्षणे आहेत. तरीसुद्धा ताप आणि खोकला जर तुम्हाला असेल तर काळजी करण्याचे कारण नाही डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन तो बारा होऊ शकतो. सामान्यपणे खोकला किंवा ताप असेल तर घाबरून जाण्याचे अजिबात कारण नाही तो कोरोनाच असेल असे न्हवे.

 

4) कोरोना झाला की मृत्यू अटळ – शंभर पेक्ष्या जास्त देशात कोरोना पसरला असून तो प्राणघातक ठरत आहे असे असले तरी कोरोना पॉझिटीव्ह प्रत्येकजण मरतोच ही एक अफवा आहे. कोरोनाचे वेळेत निदान होऊन योग्य उपचार आणि काळजी घेतली की रुग्ण बारा होतो. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. चीन मधून ठणठणीत बरे झालेल्या रुग्णांची माहिती आता बाहेर येत असून लोकांनी भिऊन जाण्यापेक्षा योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

 

5) अल्कोहोल सेवनाने कोरोना होणार नाही– दारू न पिणारे लोक हि अफवा ऐकून जर दारू प्यायला सुरवात करणार असतील तर सावधान अल्कोहोल किंवा दारू यांच्या सेवनामुळे कोरोना होणार नाही या गोष्टीला कोणताच वैद्यकीय किंवा शास्त्रीय पुरावा नाही ज्यामुळे कोरोना होऊ शकत नाही.

 

6) शेण आणि गोमूत्र कोरोनापासून वचावासाठी जालीम उपाय आहेत – दारूप्रमाणे ही सुद्धा एक अफवा सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. अल्कोहोलप्रमाणेच  शेण आणि गोमूत्र यासुद्धा उपायाला काहीच वैद्यकीय पुरावा नाही. तेंव्हा कुणी तुम्हाला गोमूत्र प्यायला किंवा शेण तोंडावर थापायला सांगितले तर तसे करू नका, ती एक अफवा आहे.

 

कोरोना विषाणू बद्दल अनेक गैरसमज आणि अफवा सोशल मीडिया वरती व्हायरल होत आहेत या अफवांवर विश्वास न ठेवता योग्य काळजी घ्यावी तसेच गरज भासल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा. कसलाच आजार दुर्लक्षित करण्यासारखा नसतो तेंव्हा दक्षता घ्या आणि अफवांपासून स्वतःला दूर ठेवा.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.