Pune : लोकसभेसाठी काँग्रेसकडून कोण? हर्षवर्धन पाटलांच्या पुण्यातील निवासस्थानी बैठक सुरू

एमपीसी न्यूज – पुणे मतदारसंघातून काँग्रेसकडून कोण उमेदवार असणार आहे याची चर्चा मागील अनेक दिवसांपासून आहे. काँग्रेसचे पुण्यातील नेते हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी सध्या पुणे लोकसभा इच्छुकांची बैठक सुरू आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील इच्छुकांशी चर्चा करत आहेत.

पुणे शहर लोकसभा मतदारसंघासाठी माजी आमदार मोहन जोशी, माजी शहराध्यक्ष अभय छाजेड आणि महापालिकेतील पक्षाचे गटनेते अरविंद शिंदे अनंत गाडगीळ, उल्हास पवार पवार इच्छुक आहेत. या सर्व इच्छुकांशी सध्या हे दोन नेते चर्चा करत आहेत.. यातून तोडगा निघेल का? हे काही वेळात स्पष्ट होईल…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.