Pune : स्थायी समितीमध्ये कोणाची वर्णी लागणार?, उद्या होणार चित्र स्पष्ट

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या तिजोरिच्या चाव्या या स्थायी समितिच्या हाती असतात. या समितीत आठ नव्या सदस्यांची निवड होणार आहे. त्याचे चित्र सोमवारी (दि. 17) स्पष्ट होणार आहे.

भाजपचे 4, राष्ट्रवादीचे 2 तर, शिवसेना आणि काँगेसचा प्रत्येकी एक सदस्य बाहेर पडणार आहे. स्थायी समितीत आपलीच वर्णी लागावी, यासाठी सर्वोपक्षीय नगरसेवकांनी आपल्या परीने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यामध्ये सर्वाधिक इच्छुक भाजपमध्ये आहेत.

भाजपतर्फे नगरसेवक आदित्य माळवे, धनराज घोगरे, प्रवीण चोरबेले, महेश लडकत, राजेश येणपुरे, स्वाती लोखंडे, अर्चना तुषार पाटील, राजश्री काळे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, माधुरी सहस्त्रबुद्धे, उज्वला जंगले इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीतर्फे नगरसेवक प्रकाश कदम, सचिन दोडके, योगेश ससाणे, गफूरभाई पठाण, प्रदीप गायकवाड, नागरसेविका सायली वांजळे, सुमन पठारे, शिवसेनेतर्फे बाळा ओसवाल, पल्लवी जावळे, तर काँग्रेसतर्फे नगरसेवक रविंद्र धंगेकर, नगरसेविका सुजाता शेट्टी यांच्या नावाची स्थायी समिती सदस्य पदासाठी चर्चा आहे. दि. 17 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत या सदस्यांची निवड होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.