Pune: आता जातीचे कार्ड वापरणारे मोदी दलितांवरील अत्याचारावर गेली पाच वर्ष गप्प का? – राज ठाकरे

स्वप्नं दाखवून भाजप सरकारने सर्वांचा केसाने गळा कापला

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणुकीचा विषय भलतीकडेच घेऊन जात आहेत. शहीद जवानांच्या नावे मते मागत आहेत. आता जातीवर मते मागायला लागले आहेत. जातीचे कार्ड वापरत आहेत. गेल्या पाच वर्षात दलित बांधवांवर अत्याचार, अन्याय झाला. त्यावेळी का बोलते नाहीत?. तेव्हा मोदी गप्प का होते?, पिछडी जात का आणली नाही? असा सवाल करत जातीच्या उल्लेखावरुन राज ठाकरे यांनी मोदी यांच्यावर सडकून टीका केली. अकलुजमध्ये झालेल्या सभेत मोदी यांनी पिछडा जातीचा असल्याने विरोधक त्रास देत असल्याचा आरोप केला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात राज ठाकरे जाहीर सभा घेत प्रचार करत आहेत. सभेच्या माध्यमातून भाजप आणि त्यांना सहकार्य करणा-या मित्रपक्षांना मतदान करु नये, असे आवाहन करत आहेत. नांदेड, सोलापूर, इंचलकरंजी, साता-यानंतर ठाकरे यांची आज (गुरुवारी) पुण्यात सभा होत आहे. सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथील गोयल गंगा मैदानावर ही सभा सुरु आहे.

  • माझ्या भाषणांच्या ‘क्लिप’ देशभर फिरत आहेत. उत्तर भारतात सभांची मागणी होऊ लागली आहे. हिंदीतून सभा घेण्याची मागणी होत आहे. पण, आपले-आपल बंर, हिंदीतून शिवीपण नीट देता येणार नाही, असे सांगत राज ठाकरे म्हणाले, नरेंद्र मोदी यांच्यावर देशातील जनतेने विश्वास ठेवला. पाच वर्षापुर्वी त्यांनी स्वप्नं दाखविली. सत्ता आल्यावर हे करील ते करील असे सांगितले. आता पाच वर्षानंतर निवडणूक होत असताना मोदी आश्वासनावर बोलायला तयार नहीत. या सरकारने सर्वांचा केसाने गळा कापला आहे, असा आरोप ठाकरे यांनी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.