Pune vaccination News : पुण्यात आजपासून फक्त दुसराच डोस मिळणार

एमपीसीन्यूज : पुण्यात गुरूवार (दि. 13) पासून शहरातील सर्वच लसीकरण केंद्रांवर केवळ दुसरा डोस मिळणार आहे. यात कोव्हिशिल्ड लसीचाच समावेश असून, ज्यांनी 29 मार्च 2021 पूर्वी लस घेतली आहे अशा नागरिकांनाच दुसरा डोस दिला जाणार आहे.

लसीचा तुटवड्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून, राज्य शासनाकडून नव्याने लस आल्याशिवाय लसीचा पहिला डोस कोणालाच उपलब्ध राहणार नसल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. दरम्यान ही लस कधी प्राप्त होईल.  ती 18 ते 44 वयोगटातील वर्गाला देणार का याबाबत कुठलीच निश्चिती नसल्याने  शहरातील पहिल्या डोसचे लसीकरण अनिश्चित काळासाठी आता पूर्णत: स्थगित झाले आहे़. यामुळे ऑनलाईन  नोंदणीही बंद असून, दुसऱ्या डोस करिता प्रथम येणाऱ्या व्यक्तीला प्राधान्यक्रम या प्रमाणे लस दिली जाणार आहे.

18 ते 44 वयोगटातील वर्गासाठी ऑनलाईन नोंदणी करून  कमला नेहरू व राजीव गांधी रूग्णालयात लस उपलब्ध होत होती. मात्र शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत या दोन्ही केंद्रांवरील 18 ते 44 वयोगटातील वर्गाचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्णपणे बंद राहणार आहे. मात्र येथे 45 वर्षे वयावरील नागरिकांना दुसरा डोस उपलब्ध राहणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.