Pune : भामा आसखेडचे पाणी मिळवून देणारच : खासदार बापट

गेल्या अनेक महिन्यांपासून भामा आसखेडचे काम संथपणे सुरू आहे. : will get water Bhama Askhed : MP Bapat

एमपीसी न्यूज – वडगांवशेरी मतदारसंघात भामा आसखेडचे पाणी मिळवून देणारच आहे. प्रसंगी त्यासाठी आंदोलन करण्याचा इशाराही खासदार गिरीश बापट यांनी दिला आहे.

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या धानोरी येथील पोस्ट ऑफिसचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

नगरसेवक अनिल टिंगरे यांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असता पोस्ट विभाग व पुणे मनपा अधिकारी यांना बापट यांनी वेळोवेळी सुचना केल्या आणि हे काम पूर्णत्वास आले. त्यामुळे नागरिकांची आता सोय होणार आहे.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष योगेश मुळीक, नगरसेविका ऐश्वर्या जाधव, मोहनराव शिंदे, धनंजय जाधव, दिलीप डाळिमकर, डाक अधीक्षक मुकुंद बडवे, उपविभागीय निरीक्षक भूषण देशमुख, पोस्टमस्टर मधुकर सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक रवींद्र कदम यावेळी उपस्थित होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून भामा आसखेडचे काम संथपणे सुरू आहे. त्यामुळे या भागाला पाणी कधी मिळणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

आता खुद्द खासदार बापट यांनीच आंदोलनाचा इशारा दिल्याने हे काम जलदगतीने पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. राजीव कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.