Pune : दहा दिवसांपेक्षा जास्त लॉकडाऊन सहन करणार नाही – फत्तेचंद रांका

Will not tolerate lockdown for more than ten days - Fatehchand Ranka :पी-1 आणि पी-2चा निर्बंधही जुमानणार नाही

एमपीसी न्यूज : सध्याचा दहा दिवसांचा लॉकडाऊन अनिच्छेने स्वीकारला आहे, तो वाढविल्यास मात्र अजिबात सहन केला जाणार नाही, असा इशारा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी दिला आहे.

लॉकडाऊनच्या एकशे वीस दिवसांच्या काळात व्यापाऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. बांधकाम क्षेत्राशी संबंधित पत्रा स्टील व्यापाऱ्यांपैकी काहींनी नैराश्यातून आत्महत्त्येची धमकी दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

या व्यापाऱ्यांनी निराश होवू नये, विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष अधिकारी सौरव राव यांनी आजच दूरध्वनीवरून संपर्क साधून लॉक डाऊन वाढवणार नाही, असे आश्वासन दिले आहे.

व्यापाऱ्यांनी आतापर्यंत सरकारला सहकार्य केले आहे. दहा दिवसही देऊ पण अकरावा दिवस आमचा असेल. लॉकडाऊन वाढविला तर व्यापारी महासंघ सहन करणार नाही.

व्यापार पूर्ववत सुरू व्हावा, अशीच मागणी आहे. पी-1 आणि पी-2चा निर्बंधही जुमानणार नाही, असे रांका यांनी स्पष्टपणे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like