Pune Winter Update : पुण्याचा पारा 7.4 अंश सेल्सिअस; थंडीने पुणेकर हैराण

एमपीसी न्यूज – पुण्याचा पारा हा दिवसेंदिवस घसरत (Pune Winter Update) असून मंगळवारी (दि.10) पुण्याचे किमान तापमान हे 7.4 अंश सेल्सिअसवर तर कमाल तापमान 29.1 सेल्सिअस नोंदवले गेले आहे. या थंडीमुळे पुणेकर मात्र पुरते हैराण झाले आहेत. कारण गुलाबी वाटणारी थंडी आता चांगलीच हुडहुडी भरवत आहे.
उत्तर भारतात आलेल्या थंडीच्या लाटेचे परिणाम महाराष्ट्रात जाणवत असून आज दिल्लीचा पारा हा 6.4 अंशावर आहे. पुणे आणि दिल्लीच्या तापमानात केवळ एक अंश सेल्सिअसचा फरक असल्याचे नोंदविले गेले आहे. यामुळे पुण्यात केवळ सकाळीच नाही तर काल (सोमवारी) रात्री आठच्या सुमारास धुकेही अनुभवायला मिळाले. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी उबदार कपड्याबरोबर पुन्हा शेकोटीचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी ढगाळ वातावरण असल्याने थंडीचा कडाका कमी झाला होता. पुढील काही दिवस हा थंडीचा कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. तेव्हा थंडीचा आनंद घ्या, पण तब्येतीची काळजी घेऊन….
Pune shivajinagar recorded 7.4c today , this the lowest temperature of the season.
Pashan: 7.3c
NDA: 7.3c
Hadapsar: 11.5c
Magarpatta: 14.4c
Ballalwadi: 13.3c
Data: IMD#punewinters— vineet kumar (@vineet_tropmet) January 10, 2023
पुणे जिल्याचे आजचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) – Pune Winter Update
1) शिवाजीनगर – 7.4
2) पाषाण – 7.3
3) एनडीए 7.3
4) हवेली- 7.1
5) माळीण – 7.5
6) शिरूर – 8.7
7) तळेगाव दाभाडे – 9.7
8) लोणावळा – 14.6
9) चिंचवड – 14.3
10)कोरेगाव पार्क – 13.6
11)हडपसर – 11.5
12)डुडुळगाव – 10.9
13) पुरंदर – 10.6
14)खेड- 17.1
15)राजगुरुनगर – 9.3
16)आंबेगाव – 11.1
17)ढमढेरे – 10.8