Pune: धक्कादायक! आजारी मुलासमोरच हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन महिलेची आत्महत्या

Pune: Woman commits suicide by jumping from fifth floor of hospital या महिलेच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वीच कर्करोगाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 13 वर्षांचा मुलगाही गंभीर आजारी आहे. यामुळे नैराश्यातून महिलेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

एमपीसी न्यूज- केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरून महिलेने उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (दि.22) पहाटे घडली. आत्महत्या केलेल्या महिलेच्या 13 वर्षीय मुलावर या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्याच्यासमोरच आईने पाचव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. यासना मुकेश बकसानी (वय 36, रा वानवडी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

या महिलेच्या पतीचा तीन महिन्यांपूर्वीच कर्करोगाने मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर 13 वर्षांचा मुलगाही गंभीर आजारी आहे. यामुळे नैराश्यातून महिलेने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे.

_MPC_DIR_MPU_II

या महिलेचा 13 वर्षांचा मुलगा किडनी व मधुमेह या आजारांनी ग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्यावर केईएम हॉस्पिटलच्या पाचव्या मजल्यावरील वॉर्डमध्ये उपचार सुरू होते.

या महिलेने सोमवारी पहाटे साडेचारच्या सुमारास या खिडकीतून खाली उडी मारून आत्महत्या केली. महिला खाली पडल्यानंतर येथील सुरक्षारक्षकांना हा प्रकार लक्षात आला. या महिलेकडे सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये आत्महत्येस कोणालाही जबाबदार धरू नये, असे म्हटले आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.