Pune : दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

एमपीसी न्यूज- पुण्यातील कर्वेनगर (Pune) भागात पायी चालत जाणाऱ्या महिलेला एका दुचाकी चालकाने दिलेल्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

रंजना प्रकाश वसवे असे अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

Pune : शिक्षणासाठी मुलीला घरी आणून बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, रंजना वसवे या कर्वेनगर परिसरात पायी जात होत्या. रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगात येणाऱ्या एका दुचाकी ने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भयानक होती की रंजना भोसले या हवेत उडाल्या आणि खाली कोसळल्या. त्यानंतर घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान या अपघातातील दुचाकीस्वार हा अल्पवयीन असल्याची ही माहिती समोर येत आहे. या अपघाताचा एक सीसीटीव्ही देखील समोर आला आहे. संबंधित दुचाकी स्वार वाहतुकीचे कुठलेही नियम न पाळता भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.