Pune : अवैध धंद्याला महिलांनी दाखवला नारीशक्तीचा हिसका

एमपीसी न्यूज- जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने महिलांनी वाघोलीमध्ये चालू असलेल्या अवैध धंद्यावर हल्लाबोल करीत नारीशक्तीचा हिसका दाखवला.

संतुलन संस्थेच्या वतीने महिलांसाठी प्रबोधन व जनजागृती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाचे नेतृत्व पिडीत कष्टकरी महिलांनी केले होते. यावेळी आक्रमक झालेल्या महिलांनी वाघोली येथील बाजार मैदान परिसरातील गावठी हातभट्टी दारुगुत्ता, मटका व जुगार धंद्यांची जाळपोळ करुन नारीशक्तीचा हिसका दाखवला. या प्रकारामुळे पोलीस आणि अवैध धंदे करणाऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.