Pune: जादूटोण्याची भीती दाखवून सफाई कर्मचारी महिलेला लुबाडलं, तृतीयपंथीयासह महिलेवर गुन्हा दाखल

Pune: Woman robbed for fear of witchcraft, woman and trityapanthi charged आरोपी महिलेने मला देवी प्रसन्न आहे, मी तुझे दागिने मिळवून देते, असे सांगून तिच्याकडून तीन हजार रुपये घेतले.

एमपीसी न्यूज- पुण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका सफाई कर्मचारी महिलेला जादूटोणा करून तिच्या कुटुंबाचे वाटोळे करून टाकण्याची धमकी देत एका तृतीयपंथीय आणि एका महिलेने आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. समर्थ पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

सुनीता पवळे उर्फ सोनी (वय 45) या महिलेसह एका तृतीयपंथीयाला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी अनिता वाघेला या महिलेने फिर्याद दिली आहे.

डेक्कन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डेक्कन परिसरात कुटुंबीयासह राहते. त्यांचा मुलगा नववीत शिकत असताना एका मित्राने परिक्षेच्या वेळी फुटलेली प्रश्नपत्रिका त्याला दिली होती. त्याबदल्यात त्याने आई-वडिलांना कळू न देता मित्राला घरातील दागिने दिले होते. दरम्यान, काही दिवसांनी फिर्यादीला हा प्रकार माहिती झाल्यानंतर त्या चिंतेत होत्या.

एके दिवशी साफसफाईचे काम करत असताना सुनीता पवळे हिच्याशी फिर्यादी महिलेची ओळख झाली. त्यानंतर फिर्यादी महिलेने मुलासोबत घडलेला प्रकार बोलता-बोलता तिला सांगितला.

त्यानंतर आरोपी महिलेने मला देवी प्रसन्न आहे, मी तुझे दागिने मिळवून देते, असे सांगून तिच्याकडून तीन हजार रुपये घेतले. त्यानंतर पुन्हा एकदा आरोपीने फिर्यादी महिलेला गाठून आज पौर्णिमेचा दिवस आहे, देवीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवायचा आहे असे सांगून पाच हजार रुपयांची मागणी केली.

फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपी महिलेने तिला जादूटोणा करून तुझं वाटोळं करून टाकू, अशी धमकी दिली आणि तिच्याकडून पाच हजार रुपये काढून घेतले.

अशा पद्धतीने आरोपी महिला आणि एका तृतीयपंथीयाने फिर्यादी महिलेकडून वेळोवेळी पंधरा हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like