Pune : प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारणार – ॲड. यशोमती ठाकूर

Women and Child Development Bhavan will be set up in every district - Adv. Yashomati Thakur : प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोगाचे केंद्र सुरु करण्याबाबत सुद्धा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

एमपीसी न्यूज – महिला व बाल विकास विभागा अंतर्गत असलेली सर्व जिल्हास्तरीय कार्यालये एकाच छताखाली आणून महिला व बालकांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल विकास भवन उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन महिला व बालकल्याण मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

पथदर्शी प्रकल्प म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून हे भवन उभारण्यात यावे, असे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद सभागृहात महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, महिला व बाल विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबविण्यात येत आहेत. जिल्हा परिषदेचा महिला व बाल कल्याण विभाग, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, महिला आर्थिक विकास महामंडळ यासारख्या विविध कार्यालयांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर या योजनांची अंमलबजावणी होते.

ही सर्व कार्यालये एकाच छताखाली आल्यास महिलांना योजनांचा लाभ घेणे अधिक सोयीस्कर होणार आहे. त्यामुळे राज्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला व बाल विकास भवन उभारण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_II

तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिला आयोगाचे केंद्र सुरु करण्याबाबत सुद्धा प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात पूरक पोषण आहाराचे नियमितपणे घरपोच वितरण करावे. याबाबत कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या एक रक्कमी लाभाचे प्रस्ताव तातडीने निकाली काढण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

तसेच जिल्ह्यात व्हाट्सअप ग्रुपच्या सहाय्याने सुरु असलेले पूर्व प्राथमिक शिक्षणाचा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

ग्राम बाल विकास केंद्र, एकात्मिक बाल विकास योजना, अंगणवाडी केंद्रांमधील सुविधा, माझी कन्या भाग्यश्री, वन स्टॉप सेंटर, डिजिटल अंगणवाडी आदी योजनांचा ॲड. ठाकूर यांनी यावेळी आढावा घेतला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.