Pune : पाणी मिळण्यासाठी महिलांचा मोकळ्या हंड्यांनी दांडिया

एमपीसी न्यूज – दसऱ्याचा सण तोंडावर असताना घरात पाण्याचा थेंबही नाही. याचा निषेध करण्यासाठी बोपोडीतील २५० महिलांनी मोकळ्या हंड्यानी महापालिका आवारात दांडिया खेळला. त्यामुळे बघ्यांची मोठया प्रमाणात गर्दी झाली होती.

महात्मा फुले पुतळा, पुणे महापालिका आवारात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. नगरसेविका सुनीता वाडेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.

या भागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले, अशी माहिती सुनीता वाडेकर यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.