Pune : कौन बनेगा महाकरोडपती लकी ड्रॉ मधून बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून महिलेची साडेतीन लाखांची फसवणूक

कौन बनेगा महाकरोडपतीमधून फोन आल्यास सावधान

एमपीसी न्यूज – कोन बनेगा महाकरोडपती सारख्या लोकिप्रिय शो मधून फोन असल्याचे सांगून लकी ड्रॉ मधून बक्षिस लागल्याचे आमिष दाखवून जवळपास 50 हजारांची फसवणूक केल्याची घटना सिंहगड येथील एका 55 वर्षीय महिलेसोबत जुलै 2017 ते 25 मे 2018 या दरम्यान घडली. याप्रकरणी धायरी येथील एका 55 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना एका अज्ञात इसमाने वेळोवेळी फोन करून तुम्हाला  कोन बनेगा महाकरोडपती लकी ड्रॉ मधून बक्षीस लागले आहे, असे सांगून ते बक्षीस हवे असल्यास टॅक्सची रक्कम भरावी लागेल, असे सांगितले. फिर्यादीने देखील विश्वास ठेवून आरोपीने सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या बॅंक खात्यात वेळोवेळी जुलै 2017 एकूण 3 लाख 28 हजार 200 रुपये  भरले. परंतु त्यांना अद्याप बक्षीसाची कोणतीही रक्कम न देता त्यांची फसवणूक करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी दोन अज्ञात मोबाईलधाकरावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पु़ढील तपास सिंहगड पोलीस करत आहेत.

कौन बनेगा महाकरोडपतीमधून फोन आल्यास सावधान

भारतातील कौन बनेगा करोडपती हा शो सर्वांच्याच पसंतीचा आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकसुद्धा आता करोडपती होण्याची स्वप्ने पाहू लागला आहे. शोच्या याच लोकप्रियतेचा फायदा घेत नागरिकांना खोटी आमिषे दाखवून फसविण्याचे प्रकार घडत आहेत. हल्ली सायबर क्राईम प्रचंड प्रमाणात वाढला असून त्याचे बळी आपणही होऊ शकतो. त्यामुळे वेळीच सावध झाल्यास मोठी फसवणूक होण्यापासून आपण वाचू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.