Pune : नवीन कंटेन्मेंट झोन सील करण्याचे काम सुरू – आयुक्त

Work begins to seal new containment zones: Commissioner

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन कंटेन्मेंट झोन पूर्णपणे सील करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी आज (गुरुवारी) दिली. या झोनमधील नागरिकांची बाहेर ये-जा वाढली आहे. त्यामुळे हा भाग पूर्णपणे सील करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.

पुणे शहरातील 27 कंटेन्मेंट झोन रद्द करण्यात आले आहेत. तर, नवीन 28 झोन करण्यात आले आहेत. या झोनमधील नागरिकांची बाहेर ये-जा वाढली आहे. त्यामुळे हा भाग पूर्णपणे सील करण्यात येत आहे.

मुख्य शिवाजी रस्ता बंद केला नाही तर, 29 ठिकाणी बॅरिगेटस् लावावे लागतात. त्यामुळे कंटेन्मेंटच्या सीमा रेषेवरील दुकानेच सुरू राहू शकतील. मुळ उद्देश हा पॉझिटिव्ह रूग्ण कमी करणे आहे.

या भागातील मार्केट आणि व्यापारी संकुल खुली होऊ शकणार नाहीत. व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू करण्याची मागणी केली आहे. मात्र, आधी आपल्याला कोरोनाचे संकट आटोक्यात आणायचे असल्याचे आयुक्त म्हणाले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य शासनाने ज्या सूचना व मर्यादा घालून दिल्या आहेत. त्यापेक्षा अधिक सवलती किंवा मर्यादेपेक्षा खाली जाऊन निर्णय घेऊ शकत नाही. मात्र, स्थानिक परिस्थिती पाहून या सवलती न देता अधिक कडक निर्णय घेऊ शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण घरी सोडत नसल्याचे ते म्हणाले. याच भागात हार्डवेअर, स्टीलची बांधकाम क्षेत्राशी निगडित दुकाने आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून दुकाने बंद असल्याने व्यापाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. ही दुकाने सुरू करण्यास पोलिसांनीही विरोध केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.