Pune : जम्बो सेंटरच्या कामाला COEP मैदानात सुरुवात : महापौर

सीओईपी येथे 800 बेड्सचे सर्व सुविधायुक्त जम्बो सेंटर उभे राहत आहे. : Work on Jumbo Center begins at COEP ground: Mayor

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने जम्बो सेंटरच्या कामाला COEP मैदानात सोमवारपासून सुरुवात झाली आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिका, पीएमआरडीए आणि राज्य शासनाच्या माध्यमातून सीओईपीच्या मैदानावर उभारण्यात येणार्‍या पहिल्या जम्बो सेंटरच्या कामाची आजपासून सुरूवात करण्यात आली.

यावेळी महापौर मोहोळ यांनी जम्बो सेंटरच्या जागेची पाहणी केली. यावेळी पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव, पीएमआरडीए प्रमुख सुहास दिवसे, आदी अधिकारी उपस्थित होते.

आपल्या शहरात टेस्टिंगची क्षमता वाढविल्यामुळे रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्याअनुषंगाने पूरक आणि सक्षम यंत्रणा उभी रहावी, यासाठी सीओईपी येथे 800 बेड्सचे सर्व सुविधायुक्त जम्बो सेंटर उभे राहत आहे.

यामध्ये 200 आयसीयू व 600 ऑक्सिजन बेड्स असणार आहेत. पुढील पंधरा दिवसामध्ये हे जम्बो सेंटर पुणेकरांच्या सेवेसाठी उभे करण्याचा मानस असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.

दरम्यान, कोरोनाचे पुणे शहरात 57 हजार 523 रुग्ण झाले आहेत. 38 हजार 117 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत या रोगामुळे 1 हजार 366 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

18 हजार 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेचे अधिकारी – कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. मात्र, कोरोना कमी होण्याऐवजी वाढतेच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.