Pune: कोरोना विरोधात प्रसन्न मनाने काम करा – निखिल वाळकीकर

Pune: Work with a happy mind against Corona - Nikhil Walkikar

एमपीसी न्यूज – प्रत्यक्षात कोरोना विरोधात लढा सुरु असताना, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या मनात विविध तणावात्मक विचार घोळत आहेत. मला कोरोना होईल का, या विचारानेही तणाव परिस्थिती मनात निर्माण झालेली आहे. अशा द्विधा तणावाच्या परिस्थितीत मात करण्यासाठी व तणावमुक्त राहण्यासाठी प्रसन्न मनाने काम करा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ निखील वाळकीकर यांनी दिला. 

पुणे मनपा अधिकारी, कर्मचारी यांच्या तणावमुक्तीसाठी व मनोबल वाढविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचे व्याख्यान आयोजित केले होते. कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाय योजना करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र प्रचंड तणावाखाली काम करीत आहेत. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त शेखर गायकवाड आणि  साखर आयुक्त सौरभ राव यांनी मनपा अधिकारी, कर्मचारी यांचे मनोबल वाढविण्याकरिता मानसोपचारतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित करणेबाबत सूचित केले होते.

त्यानुसार मानसोपचार तज्ञ निखील वाळकीकर यांचे ‘मन स्वास्थ्य व ताणतणाव’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. पुणे महानगरपालिकेच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात हा कार्यक्रम झाला.

यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, साखर आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अरवाल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) शान्तनू गोयल, शहर अभियंता प्रशांत वाघमारे तसेच सर्व सहमहापालिका आयुक्त, उपायुक्त, खातेप्रमुख, परिमंडळ आयुक्त, महापालिका सहाय्यक आयुक्त उपस्थित होते.

दरम्यान, सध्या पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट असल्याने महापालिका, अधिकारी, कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत. त्यामध्ये 50 च्या वर कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यांच्यामध्येही भितीचे वातावरण असताना कोरोना विरोधातील लढा सुरूच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.